नॉन व्हेज खाणे आहे आरोग्यासाठी हानिकारक, जाणून घ्या ‘का’?

0

नॉन-व्हेज खानाऱ्यांचे पोट दररोज नॉन-व्हेज खाऊनच भरते. अशा लोकांना दररोज कोंबडी किंवा मांस खाणे आवडते. मांसामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी आणि झिंक, मॅग्नेशियम, लोह यासारखे विविध पोषक घटक असतात. आपल्याला माहिती आहे की या सर्व पोषक तत्वे शरीरस केवळ मर्यादित आवश्यक असते. परंतु काही लोकांना आपल्या रोजच्या आहारात मांसाचे सेवन करणेच आवडते जे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी अभ्यासात असे आढळले आहे की आठवड्यातून तीन किंवा अधिक दिवस मांस सेवन केल्यास हृदयरोग, मधुमेह इतर आजार बळावण्याची शक्यता वाढते.

अभ्यासानुसार, आहारामध्ये मांसाचे वारंवार सेवन केल्याने नऊ प्रकारच्या कर्करोग नसलेल्या आजारांचा धोका वाढतो. यूकेमधील संशोधकांनी रोग आणि मांस यांच्यातील संबंध सत्य ठरवले आहे. संशोधनानुसार, नियमितपणे मांसाचे सेवन करणारे लोकांमध्ये हृदयरोग, मधुमेह, न्यूमोनिया आणि इतर काही गंभीर आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
पूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले होते की लाल मांस किंवा प्रक्रिया केलेले मांस जास्त प्रमाणात घेतल्यास आतड्यांचा कर्करोग होऊ शकतो, परंतु या संशोधनात प्रथमच हृदयरोग, मधुमेह, न्यूमोनियासारख्या रोगांचा थेट संबंध मांसाशी जोडला गेला आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांना त्यांच्या संशोधनात असे आढळले आहे की आठवड्यातून तीन दिवस प्रक्रिया केलेले मांस किंवा कुक्कुट मांस खाल्ल्याने ९ वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. या संशोधनामुळे जागरुक राहण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा दावा बळकट ठरतो.
हृदय रोग, न्यूमोनिया, डायव्हर्टिक्युलर रोग, कोलन पॉलीप, मधुमेह, गॅस्ट्रो-एसोफेजियल रिफ्लेक्स रोग, जठरासंबंधी, ड्युओडेनिटिस. संशोधकांच्या मते मांसाचे सेवन, विशेषत: लाल आणि प्रक्रिया केलेले मांस हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हा अभ्यास सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी यूकेमध्ये मध्यम वयातील सुमारे ५ दशलक्ष लोकांचा 8 वर्ष अभ्यास केला. त्याच्या आरोग्याच्या नोंदी वेगवेगळ्या रुग्णालयांतून तपासल्या गेल्या आणि त्यांच्या आहार आणि वैद्यकीय इतिहासाचे विश्लेषण केले गेले. आठवड्यातून तीन दिवस किंवा त्याहून अधिक मांस खाल्लेल्या व्यक्तींनी मांसाचे सेवन न करणाऱ्यांच्या तुलनेत त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम दर्शविला. युनिव्हर्सिटी ऑफ न्युफिल्ड विभाग ऑफ पॉप्युलेशन हेल्थचे तज्ज्ञ डॉ. कॅरेन पेपीयर म्हणाले की जो माणूस दररोज नॉन प्रोसेस्ड रेड मीट किंवा प्रोसेस्ड मांसाचे ७० ग्रॅम सेवन करतो त्याला मधुमेहाचा धोका ३० टक्के वाढतो, तर हृदयविकाराचा धोका वाढतो १५ टक्के वाढतोे. त्याचप्रमाणे, रोज ३० ग्रॅम पोल्ट्री मांसाचे सेवन केल्याने मधुमेहाचा धोका १४ टक्क्यांनी आणि गॅस्ट्रोओफेजियल रिफ्लेक्सचा धोका १७ टक्क्यांनी वाढतो.संशोधनातून समोर आले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.