निसर्गाचे सौंदर्य जपून कामे करणार – आदित्य ठाकरे

0

राज्यात निसर्ग संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे विकास कामे करताना दिसून येत आहेत. निसर्गाचे संवर्धन आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत निसर्गाच्या सौदर्य आहे असे पोहचले पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच विकासात्मक इतर कामे करताना निसर्ग सौदर्य जपणे महत्त्वपूर्ण आहे.

“पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पवई तलाव परिसरातील संवर्धन व सुशोभिकरण कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. येथे नियोजित सुमारे १० किमी.च्या सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅकची पाहणी केली. तसेच परिसरात ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था, विविध ठिकाणावरून एन्ट्री-एक्झिटची सोय यासारख्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले”. तसेच निसर्गाचे सौंदर्य जपून नवीन वर्षापर्यंत काम पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे असेही ते म्हणाले.

पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने आदित्य ठाकरे चांगले काम करताना दिसून येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.