
आपण कुठे कुस्ती जिंकली आहे का? या प्रश्नावर यावर आ.निलेश लंके यांचे मजेशीर उत्तर!
आमदार निलेश लंके यांना सुरुवातीच्या काळामध्ये कुस्तीचा मोठा शौक होता. त्यांनी चांगल्या चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत. ते जसे कुस्तीच्या आखाड्यामध्ये प्रसिद्ध होते त्यापेक्षा कैक पटीने जास्त राजकीय आखाड्यामध्ये प्रसिद्ध आहेत. सतत त्यांची राज्यभरामध्ये चर्चा होत असते; त्यांच्या कामाचे उभ्या महाराष्ट्रातून कौतुक होत आहे असेच त्यांना कुस्ती बद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले आहे.
आ. निलेश लंके यांना पत्रकारांनी आपण मल्ल आहात,आपण कुठे कुस्ती जिंकली आहे ? असा प्रश्न विचारला होता. त्यावर मजेदार उत्तर देत निलेश लंके म्हणाले की “मी विधान सभेला कुस्ती मारली की सर्व प्रस्थापितांच्या विरोधात” यावर पत्रकाराने पुन्हा विचारले की यात्रेत वैगेरे कुठे कुस्ती मारली आहे का? त्यावर निलेश लंके म्हणाले की “आपला शौक आहे, मी मोठ्यांनाशी लढाई खेळतो, हम लढाई कभी छोटे से नहीं करते”! असे ते म्हणाले त्या बरोबरच सगळीकडे हशा पिकला आणि सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
निलेश लंके यांचा असा स्वच्छंदी स्वभाव पहिल्यांदाच पाहिला मिळाला आहे. एकदम मजेशीर बोलणे आणि समोरच्याच्या मनाचा ठाव घेणे यामध्ये पण आमदार निलेश लंके चांगलेच पारंगत आहेत.