नाणार रिफायनरी प्रकरणात राज ठाकरे यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र !

0

नाणार रिफायनरी प्रकल्पाला सर्वात अगोदर शिवसेनेने विरोध केला होता. त्यानंतर नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षानेही विरोध करण्यास सुरुवात केली. शिवसेना आणि राणेंच्या विरोधात सुर मिसळून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पर्यावरणाची हानी होईल, असे सांगत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांनी नाणारला विरोध केला होता.

दरम्यान राज ठाकरे पण आता राज ठाकरे यांचा सूर पालटला असून राजापूर नाणार रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण तापले असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. पत्रातून कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘ रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला. असे आवाहन केले आहे. त्यांनी चारपानी पत्रातून राज्यातील एकूणच कोरोनामुळे बिकट झालेली अर्थव्यवस्थेत नाणार रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातून गेला तर महाराष्ट्राला परवडणारे नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

त्यामुळे या प्रकल्पावर सरकारने सामंजस्याची भूमिका घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. पर्यावरणीय चिंता मी देखील समजू शकतो पण ह्या तांत्रिक बाबींसाठी तज्ञांचीच मतं ग्राह्य धरायला हवीत. जैतापूर प्रकल्पाच्या वेळेस मी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ श्री. अनिल काकोडकर ह्यांच्याशी बोलून माझ्या मनातील शंका दूर केल्या होत्या. त्याच पद्धतीने तज्ज्ञांशी संवाद साधून कोकणच्या पर्यावरणाचं नुकसान कसं होणार नाही हे पहायला हवं. जो प्रकल्प रोजगाराच्या आणि स्वयं-रोजगाराच्या अमर्याद संधी आणेल तो आपण स्वीकारणं ही आजची गरज आहे, असं देखील त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राउत यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले असून नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्या फायद्यासाठी राज ठाकरे ही मागणी करत आहेत का खरंच कोकणाच्या हितासाठी त्यांनी ही मागणी केली आहे, याची मला कल्पना नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.