देवेंद्र फडणवीस अत्यंत खोटारडे-धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा घणाघात

0

मुंबई : मुंबई पोलिस परमवीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली असून राज्य सरकार भ्रष्ट असल्याच्या अफवा उठल्या आहेत.ज्या परमवीर सिंहांच्या लेटर नंतर हा आततायीपणा सुरू आहे त्यांचे पुत्र भाजपचे जावई आहेत, भाजपचे मोघे यांच्या कन्येचा त्यांच्या मुलाशी थाटामाटात विवाह पार पडला आहे.

अशावेळी त्यांनी दिलेल्या पत्रावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका सुरु केली आहे.वस्तुतः भाजपच्या आडमुठ्या धोरणात महाविकास आघाडी अस्तित्वात आली व त्यांनी महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न केला आहे.कोरोना संकटाशी सामना करत असताना अनेक विकास काम करण्याचा प्रयत्न केला आहे.

अशावेळी देवेंद्र फडणवीस खोटे आरोप करत जनतेला वेठीस धरत आहेत.देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती करत धुळ्याचे माजी आमदार आणि सध्या राष्ट्रवादीत असलेले अनिल गोटे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.देवेंद्र फडणवीस सरकार असताना त्यांच्याशी मतभेद झाल्याने तसेच त्यांची कार्यपद्धती न आवडल्याने भाजपला रामराम करत अनिल गोटेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

मंगळवारी फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पोलिस बदल्याच्या रॅकेटचा आरोप केल्यानंतर अनिल गोटेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात परिपत्रक जारी केल असून त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस आकांडतांडव करत असून ते नेहमीच अत्यंत अहंकारी राहिलेले आहेत.असे नमूद केले आहे.पोलीस यंत्रणेचा वापर करून देवेंद्रनी पक्षांतर्गत विरोधकांनाच नव्हे तर ओबीसी नेत्यांना संपवण्याचा घाट घातला आहे.अशा प्रकरणांची जथ्थी माझ्याकडे उपलब्ध असल्याच गोटेंनी या पत्रकात म्हटल आहे.

भाजपवर जोरदार टीका करत अनिल गोटेंनी यावेळी देवेंद्र सरकारवर कोट्यवधी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.फडणवीस सरकार असताना मी स्वता देवेंद्रना कोणत्या मंत्र्यांनी,कुठल्या आयुक्तांच्या मदतीने किती पैसे गोळा केले, किती वाटले, कुणाकडे उतरवले याची माहिती मी स्वता देवेंद्र फडणवीस यांना दिली होती, परंतु देवेंद्रनी या मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना क्लिन चिट दिली.फडणवीसांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नसून त्यांनी ती नैतिकता गमावल्याच त्यांनी स्पष्ट केल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.