
दुबईचे व्यापारी इक्बाल शेख बनून बेळगावमध्ये आंदोलन केले होते..भुजबळांचा आठवणींना उजाळा!
बेळगाव कारवार निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी महाराष्ट्रातील नेत्यांची कायम भूमिका राहिलेली आहे. त्या साठी आंदोलने, गनिमी काव्याने बेळगाव मध्ये जाऊन केलेलं आंदोलन अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आज महाराष्ट्रातील मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटरवर ट्विट करत अठवणीला उजाळा दिला आहे.
“कानडी सक्तीच्या विरोधात आणि बेळगांव-कारवार सीमाप्रश्नी ४ जून १९८६ रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने वेशभूषा करून बेळगावात आंदोलन केले होते. आज त्याला ३५ वर्ष पुर्ण होत आहेत.महाराष्ट्रातुन येण्याचे मार्ग बंद केल्यानंतर गोवा मार्गे वेशभुषा करून बेळगावात दाखल झाले होते.
झालो.दुबईचे व्यापारी इक्बाल शेख यांची वेशभूषा मी केली होती. बेळगावात दाखल झाल्यावर आम्ही आंदोलन केले,यानंतर आम्हाला अटक झाली होती.धारवाडच्या तुरूंगात दोन महिने काढल्यानंतर आमची सुटका झाली. यावेळी माझ्यासोबत दगडू सकपाळ, बाबा पिंगळे,अरविंद तायडे, हेमंत मंडलिक व असंख्य शिवसैनिक होते.प्रमोद नलावडे यांनी वेशभूषा करण्यात मला मदत केली होती”.
महाराष्ट्राचा लढावू बाणा उभ्या जगाला ठावूक आहे. हाच लढावू बाणा दाखवत; गनिमी काव्याने बेळगाव मध्ये जात मराठी माणूस अस्मितेसाठी, न्यायासाठी काय करू शकतो याचे उदाहरण म्हणजे हा प्रसंग सर्वांच्या डोळ्या समोर उभा राहतो!
कानडी सक्तीच्या विरोधात आणि बेळगांव-कारवार सीमाप्रश्नी ४ जून १९८६ रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने वेशभूषा करून बेळगावात आंदोलन केले होते. आज त्याला ३५ वर्ष पुर्ण होत आहेत.महाराष्ट्रातुन येण्याचे मार्ग बंद केल्यानंतर गोवा मार्गे वेशभुषा करून बेळगावात दाखल pic.twitter.com/iukiq2YwZj
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) June 4, 2021