माउण्ट एव्हरेस्टला गवसणी घालणाऱ्या महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्याचे गृहमंत्र्यांनी केलं कौतुक!

0

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे पोलीस प्रशासनाला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सतत प्रोहस्ताहण देताना दिसून येतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असावं हे. जगातील सर्वोच्च शिखरावर जाऊन पोलीस प्रशासनाचा झेंडा रोवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांचे कौतुक गृहमंत्री यांनी केलं आहे.

“जगातील सर्वोच्च पर्वत शिखर माउण्ट एव्हरेस्टला गवसणी घालणारे पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. ही उत्तुंग कामगिरी करणारे महाराष्ट्र पोलिस बलातील पहिले मराठी अधिकारी ठरल्याबद्दल गुरव यांचा सार्थ अभिमान असल्याचे गृहमंत्री म्हणाले”.

सांगली जिल्ह्याचे सुपुत्र संभाजी गुरव यांनी २३ मे रोजी एव्हरेस्ट शिखर सर केले. त्यांनी केलेलं कार्य हे महाराष्ट्र पोलीस प्रशासनाचे मान उंच करणारे आहे. त्यांची समाजात एक धाडसी अधिकारी म्हणून ओळख आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.