त्या प्रिवेडींगवाल्यांना कशाला अडवताय, ते हनिमूनलाही इथे आले पाहिजेत, अजित पवारांनी दिला प्रेमळ दम!

0

महाराष्ट्रातील पर्यटन विकास झाला झाला पाहिजे. लोकांनी कोकणात पर्यटनाच्या हेतूने आले पाहिजे. या हेतूने राज्य सरकारने ३० कोटी रुपयांचा भरीव असा निधी मंजूर केला आहे. श्रीवर्धनच्या विकासासाठी 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. आज श्रीवर्धन येथील बीच सुशोभीकरण चा अजित पवारांच्या हस्ते नारळ आज फोडण्यात आला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीचची पाहणी केली. तसेच तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. अजित पवारांनी बीच पाहिला असता त्या ठिकाणी बीचची काळी वाळू पडलेली पाहून त्या बद्दल चिंता व्यक्त केली.

अजित पवार म्हणाले की “प्रीवेडिंग शूटसाठी इकडे कपल येतात, पण त्यांना श्रीवर्धनमध्ये स्थानिक लोक अडवतात, फोटो काढू देत नाहीत, वादावादी होते, प्रकरणं पोलीस स्टेशनपर्यंत जातात. पण असं करु नका, अडवू नका. त्यांना फोटो काढू द्या, इथलं पर्यटन इतकं वाढवा की लग्नानंतर जोडपी हनिमूनलाही इकडेच आली पाहिजेत. अॅनिव्हर्सरी असो, बर्थ डे असो सगळे कार्यक्रम इकडेच झाले पाहिजेत, असं इथलं पर्यटन वाढवा, असं अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले. त्यावर, श्रीवर्धनचं गतवैभव पुन्हा अधोरेखित करु. निसर्गाने नटलेल्या परिसराचा विकास करु असे अजित पवार म्हणाले.

अजित पवारांच्या अभ्यासाचा आवाका फार मोठा आहे. त्यांनी बीच सुशेभिकरण, लॅंडस्केपिंग, झाडांची लागवड, वादळात हॉटेल कसे टिकतील, या सगळ्यांची इंजिनिअरकडून माहिती घेतली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी श्रीवर्धन लोकसभा खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.