त्याने चक्क ज्वालामुखीवर शिजवला ‘हॉटडॉग’ व्हिडिओ होतोय व्हायरल

0

आईसलँड : जगभरात अनेक ज्वालामुखी आहेत. त्यातले काही ज्वालामुखी मृत तर काही सुप्तावस्थेत तर काही जागृत आहेत. आइसलॅंडमध्ये देखील तब्बल ६ हजार वर्षापासून शांत असलेल्या एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. त्या ज्वालामुखीचे नाव आहे, ‘माउंट फॅगराडेल्सफाल’.

या पर्वतावर ज्वालामुखीचा पहिला स्फोट ४ दिवसांपूर्वी झाला होता. तेव्हापासून सतत या ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर येत आहे. हा ज्वालामुखी आइसलॅंडच्या ‘रेकजाविक’ शहरापासून ३५ किमी दूर आहे. या ज्वालामुखीतून निघालेल्या लाव्हारसाची १६४० फूट उंचीची आकृती तयार झाली आहे.

ज्वालामुखीचा हा नजारा बघण्यासाठी तिथे दररोज हजारो लोक येत आहेत. सोबतच अनेक वैज्ञानिकही तिथे हजर आहेत. ते या ज्वालामुखीच्या उद्रेकाची कारणं शोधत आहेत. यावेळी त्यांना भूकही लागली. तर त्यांनी हॉटडॉग बनवण्यासाठी जी रेसिपी वापरली ती पाहून सगळे हैराण झाले. वैज्ञानिकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

http://https://twitter.com/i/status/1374506609993338884

सामान्यपणे हॉटडॉगच्या फिलिंगसाठी सॉसेज ग्रिल केले जातात. पण ते लाव्हारसावर ग्रिल करण्याची अनोखी आयडिया त्यांनी लढवली. 

आइसलॅंडमध्ये दर पाच वर्षांनी एक ज्वालामुखीचा उद्रेक होतोच. तसेच इथे २०१४ पासून आतापर्यंत दरवर्षी १ हजार ते ३ हजार भूकंप आले आहेत. गेल्या आठवड्यात आइसलॅंडमध्ये १८ हजार भूकंप आले आहेत. ज्यात रविवारी ३ हजार भूकंप आले. यातील ४०० भूकंप हे याच ज्वालामुखीच्या भागात झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.