ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार ऑफलाईन परीक्षा.शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

दहावी आणि बारावी परीक्षेचं चोख नियोजन...

0

मुंबई : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे चोख नियोजन झाले असून परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेतल्या जातील, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या कोरोनाचा धोका वाढत असताना दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत अनेक शंका-कुशंका घेतल्या जात होत्या.विद्यार्थ्याही संभ्रमात होते, अशावेळी पत्रकार परिषद घेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व नियोजन मांडत शंका दूर केल्या.

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा असून इतर वर्षांपेक्षा यंदाची परिस्थिती वेगळी असून कोरोनाचा धोका विचारात घेऊन परीक्षांचे नियोजन केल्याचे त्या म्हणाल्या.अनेक विद्यार्थी परिक्षा ऑनलाईन होणार की, ऑफलाईन याबाबत साशंक होते परंतु विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी शंका ठेवू नये कारण परीक्षा ऑफलाईन होणार असून प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन द्याव्या लागणार आहेत.

परीक्षा देताना विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.राज्यात कोरोनाचा धोका वाढला असून ही परिस्थिती आपणा सर्वांनाच नवीन असून विद्यार्थी याला समर्थपणे तोंड कसे देतील याचा विचार सगळ्यांनी करून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवा असेही त्या म्हणाल्या.दहावी आणि बारावी परीक्षेच नियोजन त्यांनी पुढील प्रकारे मांडल.

1. 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान दहावीची परीक्षा सुरू होणार
2. 23 एप्रिल ते 1 मे दरम्यान बारावीची परीक्षा सुरू होणार
3. सकाळी 10.30 मिनिटांनी परीक्षा सुरू होणार
4. 80 गुणांसाठी अर्धा तास जास्त वेळ तर 40 ते 50 गुणांसाठी 15 मिनिट जास्त वेळ देण्यात येणार
5. दिव्यांग विद्यार्थ्यांना 1तास जास्त देण्यात येणार
6. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 22 मे ते 10 जून दरम्यान होणार
7. परीक्षा केंद्रावर सॅनिटायजर,मास्क,पीपीई कीट उपलब्ध असणार
8. कंटेनमेंट झोनमध्ये परीक्षेची वेगळी व्यवस्था करणार
9. परीक्षा काळात कोरोनाचा झाल्यास त्यांची परीक्षा जूनमध्ये घेणार

सध्या दहावी तसेच बारावीचे वर्ग त्या त्या शैक्षणिक इमारतीत भरत असून यापूर्वी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. परीक्षांसाठी आधी ठरवून दिलेला अभ्यासक्रमच कायम राहणार आहे.विद्यार्थ्यांना वाहतुकीचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली असून मुंबईतील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी त्यांच्या पालकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा विचार असल्याच त्यांनी सांगितल.

विद्यार्थांना परीक्षा देण्यासाठी दुसऱ्या केंद्रावर जाण्याची गरज नसून त्यांच्या शाळेतच त्यांनी परीक्षा द्यायची आहे.शाळेच्या वर्ग खोल्या कमी पडल्यास जवळचीच शाळा उपकेंद्र करून तेथे विद्यार्थ्यांची सोय करण्यात येईल.लेखी परिक्षा झाल्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल ही परीक्षा असाईनमेंट पध्दतीने असेल व हे असाईनमेंट 15 दिवसात जमा करावे लागतील.तसेच कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा जूनमध्ये घेण्यात येईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.