जेनेलियाने रितेशला मारला पंच

0

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख एका कार्यक्रमात प्रीती झींटाशी बातचीत करत तिच्या हातांना किस करत तिला मिठी मारली हे करताना त्याची पत्नी जेनेलिया त्याच्या सोबतच बाजूला उभी होती.जेनेलियाचा पारा या सर्वांमुळे थोडासा चाललेला दिसतो.शेवटी बायको नवरोबाला दुसरया स्त्रीला मिठी मारताना कशी पाहू शकते.परंतु फिल्म इंडस्ट्रीत असणारी जेनेलियाने हे सर्व पडद्यावर पाहू शकते.मात्र प्रत्यक्षात रितेशने एका कार्यक्रमात जेनेलियासमोरच हे करण्याच धाडस केल.रितेश आणि प्रीती झींटा एकमेकांसोबत बोलत असून त्यात ते एकमेकांना मिठी मारताना दिसून येतात.यात जेनेलियाचा नाराज चेहरा दिसून येतो.जेनेलिया कार्यक्रमात तर गप्प बसली पण खुन्नस ठेवत नंतर मात्र तिने रितेशला चांगलाच पंच मारला.नेमक काय आहे प्रकरण सविस्तर वाचा.

जेनेलिया,रितेश आणि प्रीती झींटा यांचा एक व्हिडिओ वायरल होत असून यात रितेश आणि प्रीती एकमेकांसमोर जातात ज्यात रितेश प्रीती झीटांचे हात हातात घेऊन किस करताना दिसून येतो, इतकच नाही तर तो तिला मिठीही मारताना दिसून येतो.विशेष म्हणजे या कार्यक्रमात जेनेलिया त्याच्या सोबत असून तिची नाराजी स्पष्ट दिसून येते.कार्यक्रमात गप्प बसलेल्या जेनेलियाने दुसरा एक व्हिडिओ बनवला असून त्यात ती रितेशला पंच मारताना दिसून येते.या व्हिडिओत दोन व्हिडिओ एकत्र करण्यात आले असून पहिल्या व्हिडिओत रितेश-प्रीतीची मिठी दिसून येते तर जोडलेल्या व्हिडिओत जेनेलिया रितेशला पंच मारताना दिसून येते.यावर रितेश नाॅकडाऊन झालेला दिसून येतो.व्हिडिओच्या बॅकग्राउंडला रामलखन चित्रपटातील तेरा नाम लिया तुझे याद किया हे गाण ऐकू येत आहे.हा कॉमेडी व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत असून रितेश जेनेलिया फॅन्सना तो खुपच आवडला आहे.

व्हिडिओच्या शेवटी जेनेलिया प्रीती झींटाला क्यूट म्हणत असून तिने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून प्रीतीला टॅग केला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.