जळगावात शिवसेनेकडून ‘भाजपा’चा गेम!

0

जळगाव : जळगावमध्ये महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक १८ मार्चला होणार असून त्या अगोदरच जळगावमध्ये महाविकास आघडीच्या दिग्गजांनी आपले राजकीय डावपेच खेळायला सुरुवात केली आहे. जळगावाचे भाजपाचे २५ नगरसेवक ठाण्यात दाखल झाले असून अजून ५ नगरसेवक त्यांच्यापाठी ठाण्यात आले आहेत. ही संख्या आता ३० वर पोहचली असून हे सर्व नगरसेवक शिवसेनत प्रवेश करत आहेत.

१८ मार्चला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला चांगलाच सुरुंग लावला असून २७ नगरसेवक फोडून सत्ताधारी भाजपाला अल्पमतात आणले आहे. एकीकडे भाजपाचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात भाजपाची होणारी वाताहत गिरीश महाजनांच्या नेतृत्वावर प्रशचिन्ह उपस्थित करते आहे.

जळगाव महानगरपालिकेचे सेनेने फोडलेले सर्व नगरसेवक आता एकनाथ शिंदेंच्या ताब्यात असून शिवसेनेच्या या कामगिरीमुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.