
जयंत पाटील आणि काँग्रेसची नरेंद्र मोदींवर टीका !!
मुंबई : जागतिक निद्रा दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील केंद्र सरकारवर टीका केली आहे. शेतकरी आंदोलन, बेरोजगारी, इंधन दरवाढ अशा अनेक मुद्यांवरून त्यांनी केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार, असा सवाल यावेळी केला. तर काँग्रेसने ”लल्ला लल्ला लोरी, खाली है कटोरी..” म्हणत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान सुमारे ३०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पाटील यांनी ट्विटमध्ये केला आहे. कोरोनानंतर देशातील बेरोजगारी, मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसचे दरही सातत्याने वाढत आहेत. विरोधकांकडूनही त्यावरून सरकारला सातत्याने लक्ष्य केले जात आहे.
जागतिक निद्रा दिनानिमित्त काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगा करतानाचा निद्रा स्थितीतील फोटो ट्विट केला आहे. ”लल्ला लल्ला लोरी, खाली है कटोरी, मोदीजी ने बेच दी, देश की तिजोरी”, असे फोटोवर लिहित काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे.
Read Also