
चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेने अति दुखात असतानादेखील प्रेक्षकांच केल मनोरंजन
कोरोनाच्या लाटेमुळे गेल्या दोन वर्षांपासून देशात अनेक प्रसिध्द व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.
त्यात अनेक प्रसिध्द उद्योगपती, कलाकार यांचा समावेश आहे. देशात दोनवेळा लॉकडाऊन लागलेला आहे. कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्यांचा मृत्यू होत असतानाच अनेक मोठ्या देश विदेशातील कलाकारांचा मृत्यू झाला. अशाच एका लोकांना हसवणार्या अभिनेत्रीवर दुखाचा डोंगर कोसळलेला आहे.
रसिकांचे मनोरंजन अभिनेत्री श्रेया बुगडे एक हरहुन्नरी असून तीचा काॅमेडीचा सेन्स उत्तम आहे. सध्या श्रेया बुगडे चला हवा येऊ द्या रियालिटी शो करत असून सध्या जयपूरमध्ये शुटींग सुरू आहे. शोच्या एका भागात श्रेया बुगडेनेही तिच्या मनात लपवलेल दुख स्वप्नील जोशीन व्यक्त केल. श्रेया बुगडेने नुकताच आपल्या २ लाडक्या मावशीला कोरोनामुळे गमावल आहे. श्रेयाला लहानपणापासूनच मावशींची सवय असून मावशींचा स्नेह मिळालेला आहे. मावशीवर माया असलेली श्रेया या दुखात असतानादेखील मालिकेचे भाग करत लोकांना हसवल. आपल दुख लपवून लोकांना आनंद देणार्या श्रेयाच कौतुक केलेल आहे.