गृहमंत्री आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडताय – जयंत पाटील

0

रिलायन्स समूहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक भरलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास NIA कडे वर्ग करण्यात आला असून त्यांनी तपासांतर्गत सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फार सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या प्रकरणात जे कोणी अधिकारी दोषी आढळतील त्यांना महाराष्ट्र सरकार पूर्णपणे प्रायश्चित्त दिल्याशिवाय राहणार नाही असा आमचा विश्वास आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातही अशाच प्रकारे उलट सुलट चर्चा झाली. त्या प्रकरणातही पोलिसांनी योग्य कारवाई केली होती. पालघर साधू हत्याकांड प्रकरणातही पोलिसांनी योग्य कारवाई करत दोषींवर कारवाई केली होती. तसेच सचिन वाझे प्रकरणातही योग्य कारवाई होईल. सरकार कोणाला पाठीशी घालणार नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

शरद पवार साहेब राज्य सरकारच्या कामकाजात अथवा आदेशात हस्तक्षेप करतात हा आरोप दुर्दैवी असून गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्या दायित्वाचे उत्तमपणे निर्वहन करत असल्याचे देखील जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.