गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणी उद्यापर्यंत निर्णय घेऊ -शरद पवारांची पत्रकार परिषदेत माहिती

0

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची दिल्ली निवासस्थानी पत्रकार परिषद झाली यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सविस्तर भूमिका घेत महा विकास आघाडी सरकार स्थिर असल्याची भूमिका मांडली.विरोधक गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा मागणारच परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी होण गरजेच आहे अस मत त्यांनी मांडले.पोलिस अधिकारी परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून गृहमंत्री पोलिसांना मॉल, पब्ज, हॉटेल यांच्याकडून महिना 300000 गोळा करण्यास सांगत असत, साधारण 100 कोटींची टारगेट ते देत असत अस या पत्रात नमूद आहे.तसेच हा प्रकार अनेक पोलिसांच्या निदर्शनास येत होता व त्यांना तो आवडत नव्हता असेही त्यांनी लिहील आहे.शरद पवारांनी या पत्रावर पुढील प्रतिक्रिया दिली.


शरद पवारांनी सांगितल परमबीर सिंह यांच्या पत्राचे दोन भाग असून पहिल्या भागात गृहमंत्र्यांवरील आरोप असून उर्वरित भागात खासदार डेलकर यांच आत्महत्या प्रकरण आहे.परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुखांवर केलेले आरोप गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी होण गरजेच आहे.ही चौकशी एखाद्या पात्र अधिकारी करतील अशी अपेक्षा असून मुख्यमंत्री यासाठी संपूर्णपणे सक्षम आहेत.परमबीर सिंह यांच्या या पत्रात त्यांची सही नसून बदली झाल्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिल्याचेही ते म्हणाले.परमबीर सिंहानी पत्रात माझा उल्लेख केला असून मला भेटून याबाबत चर्चा केल्याच लिहिल आहे.परमबीर सिंह हे मला भेटायला आले होते हे खर आहे परंतु ते बदलीबाबत भेटले तसेच मुकेश अंबानींच्या निवासस्थानी सापडलेल्या स्फोटके प्रकरणाविषयी ते बोलले होते.

गृहमंत्री देशमुखांवर केलेले आरोप गंभीर असले तरी त्यांची बाजू ऐकून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.पत्रकार परिषदेपूर्वी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोललो असून यानंतर याविषयी राष्ट्रवादी नेत्यांची कोणतीही बैठक होणार नसल्याचे स्पष्ट केल.मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री अनिल देशमुखांच्या चौकशीचे संपूर्ण अधिकार असून ते त्यांची निश्चितच सखोल निष्पक्ष चौकशी करतील असही त्यांनी स्पष्ट केल.
गृहमंत्री देशमुखांवर निर्णय घेण्याबाबत ते म्हणाले की, आपण उद्यापर्यंत त्यांचा निर्णय घेऊ, तोपर्यंत तेच गृहमंत्री राहतील.अनिल देशमुखांचा राजीनामा सर्वांशी बोलूनच घेतला जाईल असही त्यांनी स्पष्ट केल.

Leave A Reply

Your email address will not be published.