गृहमंत्री अनिल देशमुखांनी भेटायला बोलावल्याचा परमवीर सिंह यांचा दावा खोटा,गृहमंत्री होते कोरोनोग्रस्त

0

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी त्यांची बदली होताच गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले असून त्यात मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी हॉटेल, मॉल्स, पब्ज यांच्याकडून वसूल ठरायला लावत होते असे लिहिले आहे.या आरोपानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. परंतु प्रामुख्याने या पत्रावर परमवीर सिंह यांची सही नसल्याने साशंकता निर्माण झाली आहे.

परमवीर सिंह यांच्या लिखित दाव्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमवीर सिंह यांना मुंबईत भेटायला बोलावल मात्र ज्या दिवशी परमवीर सिंह यांना देशमुखांनी भेटायला बोलावल्याचा दावा परमवीर सिंह करत आहेत त्या दिवशी अनिल देशमुख कोरोनाची लागण झाल्याने नागपुरात विलगीकरणात होते व रुग्णालयात उपचार घेत होते.तसेच यावेळी गृहमंत्री देशमुख यांची प्रकृती बरी नव्हती व त्यांना बोलण्यासही त्रास होत होता.परिणामी गृहमंत्री देशमुख यांनी त्यांना भेटायला बोलावल्याचा दावा खोटा ठरत आहे.या खुलाशावर अद्याप परमवीर सिंहांची प्रतिक्रिया आली नसून त्यानंतरच याबाबत खुलासा होऊ शकेल.

मुकेश अंबानी प्रकरणात त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सापडलेली स्फोटक यात सचिन वाझे यांच नाव सामोर येत असून तपासाचे धागेदोरे परमवीर सिंहांपर्यंत पोहोचू शकत होते परिणामी त्यांनी आपल्यावर खोटे आरोप केल्याच गृहमंत्री अनिल देशमुखांनी ट्विट करत सांगितल होत

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.