
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे विविध पुरावे सादर केल्याने राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
दरम्यान या प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव यांनी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात तयार केलेला अहवाल बनावट असून तो अहवाल नवाब मलिक व जितेंद्र आव्हाड या दोन मंत्र्यांनी तयार केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. यावर राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांनी फडणवीसाना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
फडणवीसांचे आरोप धांदात खोटे असून जवळच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे फडणवीस घाबरले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ज्या रश्मी शुक्लांच्या हवाल्याने हे पुरावे गृह सचिव व राज्यपालांकडे दिले, त्या रश्मी शुक्ला यांनी स्वत फोन टेपिंग करण्यासाठी तत्कालीन राज्याचे गृह सचिव सीताराम कुंटे यांची परवानगी घेतली नव्हती, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले होते. यावर फडणवीसानी हे टीका देखील केली होती, पण आता कुंटेनी अहवाल सादर केल्यामुळे गोची झालेल्या फडणवीसाना हा अहवाल बनावट असल्याचे म्हणावे लागले आहे.
मुंबईत प्रेस घेतली त्यावेळी खुलासा करताना या रश्मी शुक्लाचा रिपोर्ट काय आहे. बेकायदेशीर फोन टॅप केले. रश्मी शुक्लाचा रिपोर्ट येईपर्यंत कुठल्याही अधिकार्यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. नंतरच्या काळात काही बदल्या झाल्या ते सांगत आहेत. १२ नावे त्यात आहेत. महाराष्ट्र पोलिसमध्ये बदल्या होत राहतात.पोलीस बोर्डच्या अध्यक्षतेखाली होतात. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम केल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.