
खेळता खेळता उद्धव ठाकरे पडले, त्यावर राज ठाकरेंचे मित्र हसले…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणजे फारच संयमी, करारी, आणि समजूतदार भूमिका घेणारे व्यक्तिgमत्व आहे. त्यांच्या सध्याच्या शांत स्वभावाचे सगळीकडे कौतुक होताना दिसतात. उध्दव ठाकरे यांचा हा स्वभाव लोकांना आवडायला लागला आहे.
उध्दव ठाकरे यांचाच हा किस्सा वरिष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी यांनी त्यांच्या ‘द कझन्स ठाकरे’ पुस्तकात लिहिलेला आहे. हा किस्सा वाचून तुम्हाला नक्कीच उध्दव ठाकरे म्हणजे काय हे सहज लक्षात येईल.
१९९७ सालची ही गोष्ट आहे. राज ठाकरे आणि त्यांचे समवयीन मित्र दादरमध्ये नियमितपणे बॅडमिंटन खेळत असत. काही दिवसांनी खेळण्यासाठी उद्धव ठाकरे तिथे आले. बॅडमिंटन खेळण्याची त्यांचीही इच्छा झाली. सामना सुरू झाला. असेच एकेदिवशी खेळता खेळता उध्दव ठाकरे पडले. बॅडमिंटन जमत, खेळता येत नाही वगैरे अशा हेतूने राज ठाकरेंचे मित्र उद्धव ठाकरेंवर हसले.
दुसऱ्याच दिवसापासून उद्धव ठाकरेंनी तिथं बॅडमिंटन खेळायला येणं थांबवलं. मात्र, त्यांनी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये बॅडमिंटनचे क्लास लावले, तिथं शिकले आणि एकेदिवशी पूर्ण शिकून पुन्हा दादरमध्ये राज ठाकरे व त्यांचे मित्र खेळत असत तिथे खेळायला आले. पूर्ण तयारीनिशी. हा किस्सा बीबीसी चे पत्रकार नामदेव अंजना यांनी लिहिलेला.
एक गोष्ट मात्र नक्की खरी आहे. उद्धव ठाकरे हा माणूस दिसतो तितका सोपा नाहीय. एखादी गोष्ट करायची त्या साठी वाटेल ते कष्ट घ्यायचे अशी या माणसाची तयारी आहे. सध्या राज्यातील परिस्थिती पाहता या माणसाचा करारी स्वभाव, निर्णय घेण्याची क्षमता, अभ्यास अशा सगळ्या गोष्टींचे महाराष्ट्राला दर्शन होते आहे.