खासदार सुप्रिया सुळेंच्या विकासात्मक दूरदृष्टीतून उजनीवर होणार जल-हवाई वाहतूक

0

दिल्ली : सुप्रिया ताई नेहमीच धोरणात्मक व दूरदृष्टीने विचार करत असतात. आधुनिक विकासाच्या दृष्टीने सुप्रिया ताईंनी पुढाकार घेतला असून, त्यानुसार बारामती लोकसभा मतदार संघातील उजनीच्या जलाशयाचा वापर जल-हवाई वाहतुकीसाठी करण्यात यावा व त्या अनुषंगाने या जलसाठ्याचा समावेश ‘उडान रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम’ मध्ये करावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सौ.सुप्रिया सुळे यांनी, केंद्रीय वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेऊन केली आहे.

यादृष्टीने निवेदनात सखोल स्पष्टीकरण देताना, उजनीचा जलसाठा इंग्रजी ‘z’ अक्षराच्या आकाराचा असून पुरेसा खोल व विशाल आहे. तसेच, पाण्यावर विमाने उतरवण्यासाठी अनुकूल वातावरणही येथे उपलब्ध आहे असे मांडले आहे. उजनीच्या या रचनेमुळे येथे हवाई उड्डाणे, तसेच लॅंडींग शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

सुप्रिया ताईंनी या प्रकल्पाची उपयुक्तता मांडताना त्यांनी, उजनीच्या जलसाठ्यापासून पुण्यातील लोहगाव विमानतळ 125 कि. मी अंतरावर आहे व अनेकांचे श्रद्धास्थान असणारी पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर ही तीर्थस्थान जवळ असल्याने, येथे जल-हवाई वाहतूक सुरू झाल्यास, त्याला उत्तम प्रतिसाद मिळू शकतो, असे नमूद केले आहे. भिगवण येथील पक्षी अभयारण्य हे दूर असल्यामुळे, उजनी जलसाठ्याचा समावेश ‘उडान रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम’ मध्ये करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भविष्यात या वाहतुकीची उपयुक्तता सांगताना त्यांनी, या वाहतुकीचा उपयोग जवळ असलेल्या नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच मुंबई या विमानतळांना जोडणारे ठिकाण होऊ शकेल, असे सांगितले. याबरोबरच इतर राज्यांमध्ये गोवा, साबरमती वाॅटर – फ्रंट आणि सरदार सरोवरातील सध्या अस्तित्वात असणाऱ्या व प्रस्तावित जल-हवाई केंद्रांना जोडणारे ठिकाण ठरू शकेल, असे नमूद केले आहे.

Read Also

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.