कोल्हापुरात गोकुळच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कसली आहे कंबर!

0

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या गायी म्हशीच्या दुधाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी व दुग्ध व्यवसायाला गती प्रदान करण्यासाठी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( गोकुळ) ची निवडणुक महाविकास आघाडीच्या चिन्हावर लढवणार असल्याची घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.

धनंजय महाडिकांच्या ताब्यातील गोकुळ दूधसंघ खेचून आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रयत्नशील असून आता त्यांना शिवसेनेची देखील साथ मिळाल्याने त्यांची बाजु अजूनच भक्कम बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ व काँग्रेसचे सतेज पाटील यांनी या निवडणुकीसाठी थेट मातोश्रीच्या मदतीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

 

गोकुळ दुधसंघ खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मालकीचा व्हावा म्हणून महाविकास आघाडी प्रयत्न करत असल्याचे सतेज पाटील म्हणाले. दुग्ध व्यवसायाला चालना देऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचे प्रयत्न आम्ही करतोय असं देखील सतेज पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान शिवसेनेची देखील जोरदार तयारी सुरू असून गोकुळ बाबत ‘मातोश्री घेईल तो सर्वमान्य आहे’, अशी भूमिका शिवसेनेचे जिल्ह्याप्रमुख अरुण दुधवडकर यांनी घेतली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.