कोरोना वाढला, निर्बंधही झाले सक्त : महाविकास आघाडी सरकारची नवी नियमावली जाहीर

0

मुंबई : महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच गुरुवारी राज्याच्या चिंतेत मोठी भर पडली असून, कोरोनाचे संकट परत गडद झाल्याचे, संध्याकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीतून दिसून आले. कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच, राज्यात रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे.

यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारचे धाबे दणाणले असून, राज्यात कोरोना साथीच्या रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेऊन, कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी, राज्यात तातडीने नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे आहेत. यासाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत. यानुसार,

  • राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारीही संख्या ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
  • धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
  • ‘मिशन बिगीन’ अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५०% कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत.
  • सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी, कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन, त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची, ते निश्चित करावे, असेही या आदेशात म्हटले आहे.
  • नाट्यगृह, सभागृहांमधील उपस्थिती देखील ५०% करण्यात आली आहे.
  • सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
  • चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावलेला नसेल, तर प्रवेश देण्यात येऊ नये.
  • लोकांकडून करोना नियमाचं पालन करवून घेण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ असेल, याची खातरजमा करून घ्यावी, असंही या आदेशात म्हटलं आहे.

राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी, नागरिकांना निर्बंधांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच या निर्बंधाचे पालन न  करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला दिले आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.