कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे

0

मुंबई : देशातील काही राज्यांतील वाढत्या कोविड संसर्गाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी महत्त्वाच्या मुद्दय़ांवर पंतप्रधानांचे लक्ष वेधले. महाराष्ट्राने वेळोवेळी केंद्रीय पथकांनी दिलेले सल्ले व मार्गदर्शन याप्रमाणे कोविडची लढाई लढली जात आहे. मधल्या काही काळात तर दिवसाला 2 हजार रुग्णांपेक्षाही कमी रुग्ण आढळायला सुरुवात झाली होती, मात्र आता काही जिह्यांत ती संख्या खूप वेगाने वाढते आहे. महाराष्ट्र किंवा देशाच्या पश्चिमी भागातील राज्यांत अचानक झालेली ही मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असून याविषयी तज्ञ, संशोधक यांनी प्रकाश टाकावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली.

 

पहिल्यांदा जेव्हा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात अली तेव्हा बहुतांश टाळेबंदी होती आणि त्यामुळे रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. कारण सर्व परिवार व शेजारीपाजारी घरी असायचे. मात्र आता सर्व व्यवहार सुरू झाल्याने व कडक टाळेबंदी नसल्याने संपर्क शोधणे विशेषतः मुंबईसारख्या महानगरात आव्हानात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तरीदेखील सर्व आरोग्य व पालिका यंत्रणांना परत एकदा युद्धपातळीवर संपर्क शोधण्याचे काम हाती घेण्यास सांगण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

Read Also

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.