केजरीवालांवर केंद्र सरकार सूड उगवते आहे, शिवसेनेची सामनातून टीका!

0

मुंबई : सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला असून दिल्ली विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांची पायमल्ली केल्याचा आरोप शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे. ही एकाधिकारशाहीची तुतारी फुंकली जात असून देशाच्या भविष्यासाठी हे घातक असल्याची टीका सेनेकडून करण्यात आली आहे.

जर राज्यपालांनीच सरकार चालवायचे असेल तर दिल्ली विधानसभा व मुख्यमंत्री हवेतच कशाला ? असा प्रश्न देखिल शिवसेनेने अग्रलेखातून उपस्थित केला आहे. केजरीवाल यांच्या जागी जर भाजपाचा एखादा मुख्यमंत्री असला असता तर गे विधेयक भाजपाने कधीच आणले नसते.

दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे तेथे सर्वाधिकार नायब राज्यपालांना असतात. हे नायब राज्यपाल लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांचा छळ करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विधानसभेची आणि बहुमताची किंमत ठेवली जात नाही. आता नव्या संशोधन विधेयकाने नायब राज्यपालांनाच दिल्ली प्रदेशाचं ‘सरकार’ बनवलं आहे, असा आरोप सामना मधून शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

राज्यपालांच्या हातात सर्व अधिकार देऊन केंद्र सरकारने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सूड उगवल्याचा आरोप देखील शिवसेनेकडून करण्यात आला आहे. राज्यपाल हे केंद्राचे थेट एजंट असल्यामुळे ते वरच्या हुकुमानुसार मुख्यमंत्र्यांना उठाबशा काढायला लावतील. हे सर्व करण्याची केंद्र सरकारला काही गरज होती काय?,असा तिखट सवाल देखील शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.