कॅन्सरच्या सुरुवातीला दिसतात ही १० लक्षणे वेळीच ओळखले तर आपला जीव वाचू शकतो.

0

कॅन्सर हा काही वर्षांपूर्वी लाइलाज आजार होता. परंतु सद्यस्थितीत उपचार पध्दतीचा पुढारलेली असून कॅन्सर म्हणजेच कर्करोगावर उपचार असून प्रथम स्टेजवर तो लक्षात येताच व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते. कॅन्सर होण्याची अनेक कारणे सांगितली जातात परंतु नेमके व ठाम कारण अजूनही सांगता येत नाही. कॅन्सर कोणत्या व्यक्तीला, कोणत्या वयात व का होऊ शकतो याचे कोणतेही ठाम ठोकताळे नसून वेळेत लक्षणे ओळखल्यास व्यक्ती पूर्ण बरी होऊ शकते. काय आहेत ती लक्षणे चला बघूया.

१) जर मेंदूंचा कर्करोग असेल तर दृष्टी अधू होणे, डोकेदुखी होणे व ही वेदना रोज जाणवत वाढत जाणे असे त्रास जाणवतात.
२) फुप्फुसाचा कर्करोग असल्यास श्वास घेण्यास त्रास होणे आणि सतत खोकला जाणवणे ही लक्षणे आढळतात.
३) स्तनांचा कर्करोग असल्यास स्तनांच्या आकारात बदल होतो. तसेच स्तन दाबले असता गाठ जाणवू लागते. स्तनाग्रे मोठी होतात.
४) सर्वसामान्यपणे शरीराच्या अवयवात अचानक बदल होणे, आकार वाढणे किंवा कमी होणे तसेच अचानक ४ ते ५ किलो वजन उतरणे ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात.
५) शरीराचा एखादा भाग अचानक सुजत असेल किंवा गाठी होत असतील तसेच पोटाचा कॅन्सर असेल तर उलटीत रक्त पडण्याचा त्रास होतो.
६) शरीरातून रक्तस्राव होत असेल, मलाशयातून रक्त पडत असेल किंवा शौचास पातळ होणे, रंगात बदल होणे असे प्रकार होत असतील तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते.
७) शरीराच्या कोणत्याही भागात अचानक गाठ उठल्यास ती गाठ डॉक्टरांकडून तपासून घ्या.
८) ब्लड कॅन्सरमध्ये चक्कर येण्यासारखी लक्षणे आढळतात.
९) बोन कॅन्सरमध्ये हाडे दुखणे, मोडणे, सांधेदुखी असे त्रास जाणवतात.
१०) गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये योनीमार्गातून पांढरा स्राव जाणे अशी लक्षणे आढळतात.

निरोगी शरीर देवाची देणगी आहे, परंतु एखादा आजार उदभवल्यास वेळीच लक्षणे ओळखत औषधोपचार करून घेणे व स्वताला बरे करणे गरजेचे असते. कोणत्याही लक्षणांचा स्वता अर्थ काढून घाबरून जाणे चुकीचे असून डॉक्टरांचा सल्ला योग्य औषधोपचार, आहार, व्यायाम यांची शरीराला जोड द्यावी.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.