तुम्हाला माहित नसलेल्या किचन टिप्स बघा अगदी सोप्या आणि साध्या

0

सध्या कामाच्या गडबडीत रोज भाजी आणण शक्य होत नाही, किंवा सोय म्हणून आठवड्याची एकदम भाजी, फळ आणली जातात. फ्रिजमुळे हा सर्व माल टिकवण सोप झालेल आहे तरीदेखील फळ आणि भाज्या योग्य पध्दतीने किटकनाशक घालवत किमान ८ ते १० दिवस कशा टिकवायच्या याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.

१) पालेभाज्या…… पालक, मेथी, शेपू, पोकळा यासह सर्व पालेभाज्यांच्या मुळाला माती लागलेली असते. परिणामी त्यांची मूळ पेंडी सोडण्यापूर्वीच कापून घ्या. आता कोवळ्या देठासकट भाजी तोडून घ्या, सर्वच पालेभाज्या अशाच निवडा. आंबाडी असेल तर पान घ्या. स्टीलच्या चपट्या डब्यात ही भाजी साठवून ठेवा. स्टील जास्त थंड राहते, परिणामी भाजी चांगली टिकते. टोमोटो धुऊन घ्या. त्यासाठी मोठ्या भांड्यात पाणी घ्या व त्यात चमचाभर व्हिनेगर घाला आता यात टोमॅटो १० ते १५ मिनिट बुडवून ठेवा. नंतर साध्या पाण्यान धुवून घ्या. देठाची बाजू खाली ठेवून एखाद्या टोपलीत ठेवून फ्रिजला ठेवा.
२) फळभाज्या…… काकडी, गाजर, मुळा या भाज्याही व्हिनेगरच्या पाण्यान धुवून नंतर स्वच्छ पाण्यान धुवून एकाच एअर टाईट डब्यात ठेवला तरी चालते. गवार निवडून एअर टाईट डब्यात ठेवल्यास दोन दिवस टिकते परंतु ती न निवडता तशीच एअर टाईट डब्यात ठेवली तर आठ ते दहा दिवह टिकते.कोबी, फ्लॉवर, दूधी, ढबू मिरची, शेवगा पाणी + १चमचा व्हिनेगर घालून या भाज्या १० ते १५ मिनिटे बुडवून घ्या. नंतर स्वच्छ पाण्यात चोळून धुवा. आता सर्व भाज्या निथळुन कोरड्या करा. बाजारात क्लीन रऽप मिळत त्यात प्रत्येक भाजी स्वतंत्र गुंडाळा चांगली टिकते.भेंडी, दोडका, वांगी वरीलप्रमाणे व्हिनेगर पाण्याची कृती करून वेगळ्या एअर टाईट डब्यात साठवून ठेवा.
३) कांदा, बटाटा, लसूण….. कांदा, बटाटा लसूण वेगवेगळे हवेशीर जाळीच्या टोपलीत साठवा हे घटक फ्रिजला ठेवू नका. उन येणार नाही अशा मोकळ्या जागी ठेवा. बटाट्यांना मोड येतात, परिणामी शक्यतो बटाटे पातळ प्लास्टीकच्या पिशवीत ठेवा. टोपलीत किंवा रॅकमध्ये कांदे ठेवण्यापूर्वी न्यूजपेपर टाका व त्यावर कांदे, बटाटे ठेवा.
४) फळे…… जी फळ आपण सालासकट खातो उदा. सफरचंद, पेअर, पेरू, बोर, इ. कोमट पाणी + १ चमचा व्हिनेगरची कृती करुन १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवा आणि नंतय साध्या पाण्यान धुवून निथरा. सफरचंदाला चकाकी यावी म्हणून वॅक्स लावतात, कोमट पाण्यामुळे ते निघून जाते. फळ कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका. ती मोकळी टोपलीत सजवून ठेवा. वरील कोणतीही भाजी व फळ साठवताना हलक्या भाज्या किंवा फळ वर जड भाज्या किंवा फळ खाली अशा पध्दतीने साठवा.
मित्रमैत्रिणींनो ही माहिती आवडल्यास आमच्या पेजला लाईक करा. लेख जरूर शेअर क

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.