काय आहे सचिन वाझेंच कोल्हापूर कनेक्शन

0

सचिन वाझे सध्या असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत.तसेच मुंबई क्राईम ब्रँचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे मुख्य आहेत.2008 साली फेक एनकाऊंटर प्रकरणी ते निलबींत झाले.2020 साली परत ते सेवेत रुजू झाले.सध्या मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणी ते वादग्रस्त ठरत असून मनसुख हिरण मृत्युप्रकरणी त्यांची एटीएस आणि एनआयए यांच्याकडून तपास सुरू आहे.अनेक एनकाऊंटर करणारे वाझे सध्या शिवसेनेशी असलेल्या संबंधांमुळेही चर्चेत आहेत.

सचिन हिंदुराव वाझे यांचा जन्म कोल्हापुरात झाला असून कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील छोट्या गल्लीत सचिन वाझे यांच वडिलार्जित घर आहे.सचिन उत्तम क्रिकेटर आहेत.शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर किंवा जिमखान्यावर ते नेहमी स्राव करत असत.सुनिल गावस्कर हा त्यांचा आवडता खेळाडू आहे.महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून ते 1990 साली सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून गडचिरोलीत रुजू झाले.त्यानंतर त्यांची बदली ठाण्याला झाली.त्यांच्या या प्रगतीत त्यांनी कुटुंबाशी असणारा संपूर्ण संपर्क तोडून टाकला.इतकच काय आईच्या अंत्यसंस्कारालाही ते हजर नव्हते.त्यांचे बंधू सुधर्म वाझे अजूनही कोल्हापुरात राहतात.

2004 पर्यंत सचिन वाझे यांची कारकीर्द सुरळीत सुरू होती,परंतु घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयास्पद मृत्यूप्रकरणी वाझे गोत्यात आले.2008 साली फेक एनकाऊंटरमुळे त्यांच पोलिस खात्यातून निलंबन झाल.यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.राजकारणात ते फारसे सक्रिय नव्हते तर ते व्यवसायात रमले व चीनमधल्या कंपन्यांशी करार करून इंपोर्ट, एक्सपोर्टचा बिझनेस सुरू केला.दरम्यान व्यावसायिक म्हणून रमले असतानाच महाविकास आघाडीच सरकार येताच 2020 साली त्यांच निलंबन रद्द होऊन त्यांना परत पोलीस खात्यात घेण्यात आले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.