काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार, नाना पटोले यांची घोषणा!

0

माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना दूरदृष्टी असणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी देशामध्ये तंत्रज्ञानाची पायाभरणी केली. त्यांनी देशात संगणकाचे युग आणले.त्यांच्या आधुनिक दृष्टिकोनाला राजकीय विरोधकांनी विरोध केला, अकांड तांडव केले मात्र आज सत्य स्वीकारावं लागले की मात्र आज सगळ्यांनी.

आज माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे निमित्त साधून काँग्रेस पक्षाने सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचा महाराष्ट्रातील जनते साठी मदतीचा हात पुढे केला आहे. काँग्रेस पक्षाने माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार आहे. या बाबतीत आमदारांनी पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

काँग्रेस पक्ष हा गरिबांचा विचार करणार पक्ष आहे. त्यांचे धोरणे हे गरिबांना विकासाकडे घेऊन जाणारी आहेत. हाच दृष्टिकोन ठेवून ही मदत काँग्रेसने केली आहे. सर्वसामान्य माणसाला याच्यामुळे निश्चित आधार मिळणार आहे. या १११ अ‍ॅम्ब्युलन्स महत्वपूर्ण लोकांच्यसाठी ठरणार आहेत. आरोग्य सुविधा सुलभ होण्यासाठी निश्चित याची मदत होईल

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.