
आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन सर्वानुमते निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार
पावसाळा जवळ आला की वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागतात. पांडुरंगाच्या भक्तीत न्हावून ज्ञानोबा तुकोबाचे अभंग म्हणत पावले पंढरीच्या दिशेने चालू लागतात. वारकऱ्यांच्या साठी वारी म्हणजे दिवाळीच विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत पाऊले पंढरीच्या वारीला उभ्या महाराष्ट्रातून वारकरी येत असतात. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे पालखी सोहळा बाबतीत राज्य सरकारने बैठक बोलावली होती.
आज आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत बैठक झाली. यावेळी पालखी सोहळ्याबाबतची त्यांची मतं जाणून घेतली. संस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करणं आवश्यक आहे, असं बैठकीत स्पष्ट केलं.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज,श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह पंढरपूरच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे.वारीला शेकडो वर्षांची पंरपरा आहे.मात्र राज्यात कोरोनाचं संकट आहे;म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत.अशा स्थितीत अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे.
आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची चर्चा केली. आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्यात येणार असे त्यांनी सांगितले!
राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये या हेतूने राज्य सरकार काम करत आहे नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत विचार करून मगच सर्वानुमते निर्णय घेण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.