
आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा गंभीर इशारा नियम पाळा अन्यथा लाॅकडाऊनला सामोरा जा
महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या वर्षी संख्या कमी असलेल्या विदर्भ,मराठवाड्यात रुग्णसंख्या वाढीचा दर तसेच मृत्यू दर चिंतेची बाब ठरत आहे.कोराना प्रतिबंधात्मक लसीकरण जोरात सुरू असून हा वेग वाढवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत.परंतु कोरोनाचा लस घेतली तरी मास्क, सॅनिटायजर,सोशल डिस्टन्सींग पाळण गरजेच असून लस घेणाऱ्या काहीजणांना कोरानाची लागण झाल्याचे समोर येत आहे.सणवार यामुळे वाढणारा प्रवासही साथ पसरण्यास कारणीभूत ठरू शकत आहे.अशा परिस्थितीत शासनाने केलेले नियम पाळण गरजेच असल्याच आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.कोरोना साथीबरोबरच राज्यात अवकाळी पाऊस गारपिटीसह सुरू झालेल आहे परिणामी हवामान बदल इतर साथीच्या रोगांना निमंत्रण देणार ठरत आहे.
राज्यात सद्या नाशिक जिल्ह्यात दिवसभरात सर्वाधिक रुग्णसंख्या वाढल्याची नोंद असून 2779 एवढे रुग्णसंख्या एका दिवसात वाढली आहे.नाशिकनंतर पुणे जिल्ह्यात 2342 रुग्ण वाढले असून 5000 च्यावर मृत्यू झाले आहेत.बुलढाणा,परभणी येथेही रुग्णसंख्या वाढत असून स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे परिणामी जिल्हाधिकारींनी बुलढाण्यात 31 मार्च पर्यंत लाॅकडाऊन वाढवला आहे तर परभणी जिल्ह्यात 24 मार्च ते 31 मार्च संचारबंदी लागू केली आहे. नंदुरबारमध्येही हीच परिस्थिती असून तेथेही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचा एवढी गंभीर परिस्थिती असूनदेखील लोक मात्र पूर्वानुभवातून न शिकता शासनाच्या नियमांना हरताळ फासत असल्याच दिसून येत आहे.पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने गर्दी नियंत्रणासाठी दुकान सम विषम पध्दतीने सुरू ठेवावीत असा प्रशासनाने आदेश काढूनही दुकानदारांनी याला विरोध करत दुकान सुरू ठेवली आहेत.बुलढाण्यात सरकारी कार्यालयात कामगार नोंदणीसाठी गर्दी झाल्याच दिसून आल आहे.मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्यान मॉल्स, रेल्वेस्टेशन येथे अँटीजेन टेस्ट करायला लावत असून त्याचा खर्च द्यावा लागत असल्यान नागरिक नाराज आहेत.उल्हास नगरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून लग्नसराईही वाढलेली आहे.लग्नाला असंख्य लोकांची उपस्थिती होत असून कोरोनाचा कोणतेही नियम पाळले जात नाहीत.या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नियम पाळा अन्यथा लाॅकडाऊनला सामोरे जा असा गंभीर इशारा दिला आहे.