आफ्रिकेत दहशतवादी हल्ला 137 जणांच शिरकाण

0

आफ्रिका : आफ्रिका खंडातील नायजर या देशात दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात गावात मृतदेहांचे खच पडलेले आहेत.या गोळीबारात 137 जण ठार झालेले आहेत.तसेच दहशतवाद्यांनी अनेक घरांना आग लावली.तीन तास दहशतवादी हा पाशवी धुमाकूळ घालत होते.अनेक गाव उध्वस्त झाली असून निरपराध नागरिकांच्या रक्ताचे पाट वाहिले आहेत.मोटर बाईक किंवा जीपमधून मोठ्या संख्येने हे दहशतवादी येतात आणि नृशंस हत्याकांड करतात.

आफ्रिकन देश हे गरीब असून दारिद्र्य, नापिकी तसेच रोगाच्या साथी यांनी हे देश गाजलेले आहेत.पायाभूत सुविधांचीही वानवा आहे.अनेक अविकसित देशांचा यात समावेश असून भरीस भर म्हणजे वांशिक हिंसाचार आणि दहशतवाद येथे पोसला जातोय.परिणामी सातत्याने दहशतवादी कारवाया होत असतात.

माली देशाच्या सीमेजवळ असणाऱ्या टाहौआतील इंटाजेन,बॅकोरेट आणि अन्य छोटी छोटी गावे उध्वस्त झाली आहेत.कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.सुरक्षा रक्षकांवरही हल्ले केले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.