आदित्य ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह!

0

 

राज्याचे पर्यावरण, पर्यटन तसेच राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. इतकेच नाहीतर संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे व प्रसंगी टेस्ट करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

‘माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या’, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

सौम्य लक्षणे असल्याने कोरोना चाचणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी जनतेला कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील केले आहे.

राज्यात सध्या कोरोनाचा उद्रेक झाला असून कोरोना रुग्णांच्या संख्येने २७ हजारांचा आकडा ओलांडला असून हा आजवरचा सर्वात मोठा उच्चांक आहे. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर झाली असून जर परिस्थिती अशीच कायम राहिली तर प्रशासनाला अजून कठोर निर्बंध लावावेच लागणार आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.