
ब्रिटन : आपण चित्रपटामध्ये हमखास पाहतो. एखादा अभिनेता, सुंदर अभिनेत्रीला बघून चक्कर येऊन खाली पडतो किंवा एखाद्या अभिनेत्रीला, सुंदर शरीरयष्टीच्या अभिनेत्याला बघून घेरी येते. मात्र, प्रत्यक्षात जर असं घडत असेल तर!
हो! तुम्ही वाचलंत ते खरं आहे. ब्रिटनच्या एका तरुणीच्या बाबतीत हे प्रत्यक्षात घडतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल! मात्र तिला असा अजीबोगरीब आजार आहे, जिथे एखादी आकर्षक व्यक्ती तिच्या समोर आली की तिचा तोलच ढासळतो आणि ती चक्क तिथंच जमिनीवर कोसळते.
क्रिस्टी ब्राऊन असं तिचं नाव आहे. ब्रिटनच्या चेशायरमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षांच्या क्रिस्टीसमोर, जेव्हा एखादी आकर्षक व्यक्ती येते, तेव्हा तिचे पाय लागलीच थरथरू लागतात. त्यावेळी तिने स्वतःला सावरलं नाही तर तिला जमिनीवर कोसळण्याची भीती असते. एखाद्याला वाटेल हे सर्वकाही ती मुद्दामून करते मात्र असं नाहीये तर तिला एक विचित्र अशी समस्या आहे.
क्रिस्टीला केटाप्लेक्सी (cataplexy) नावाचा एक मानसिक आजार आहे. यामध्ये राग, आनंद आणि भीती अशा भावना तीव्र भावनांमुळे अटॅक येतो आणि शरीराचा तोल राहत नाही. पॅरालेसिस झाल्यासारखी परिस्थिती उद्भवते.
याबाबतीत क्रिस्टीने सांगितलं, जेव्हा मी कोणत्याही आकर्षक व्यक्तीला पाहते, तेव्हा माझे पाय जागीच थरथर कापू लागतात. मला खाली पडण्याची भीती असते. त्यामुळे मी कधीच वर बघत नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मी नेहमी खाली बघूनच चालते.
तसचं राग आला, जास्त हसल्यानंतरही ती अशीच जमिनीवर कोसळते कारण या तीव्र भावना आहेत. उंची म्हणजे, जेव्हा ती वाद घालते तेव्हा तर ती थेट बेशुद्धच होते. क्रिस्टीने सांगितल्यानुसार दिवसातून तिला कमीत कमी ५ आणि जास्तीत ५० वेळा केटाप्लेक्सीचे अटॅक येतात. हे अटॅक २ मिनिटांपुरते असतात. पण यामुळे तिला घराबाहेर पडणंही अशक्य होतं.
या डिसॉर्डरला नारकोलेप्सीसोबत जोडलं जातं. क्रिस्टी नारकोलेप्सी जीनसोबत जन्माला आली आहे. वयाच्या ९व्या वर्षी तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तिची समस्या जास्त वाढली, असं तिनं सांगितलं.