
अर्ध्या रात्री अजितदादांचा फोन; आर.आर. आबांच्या मुलाने जागवली रात्र!
रुग्णांना त्रास होऊ नये त्यांना तत्काळ सुविधा मिळाव्यात म्हणून रात्रीचा दिवस करत रोहित पाटील काम करत आहेत. साधारणतः तासगाव मध्ये दिवसाला २०० रुग्ण आढळून येत आहेत. ऑक्सिजन चा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतो आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून रोहित पाटील यांनी राज्य सरकार कडे वेळोवेळी ऑक्सजन टँकर ची मागणी केली होती, तसेच ते पाठपुरावा सुद्धा करत होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या मागणीला समजून घेत ऑक्सिजन टँकर पाठवले.
मध्यरात्रीच्या सुमारास साधारणतः १२:३० वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोन आर.आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांना आला. ऑक्सिजनचा टँकर सांगलीला पाठवलेला आहे. स्वतः जाऊन उतरून घे असे त्यांनी सांगितले. वेळ वाया न घालवता रोहित पाटील यांनी मध्यरात्रीच्या वेळी जाऊन टँकर उतरून घेतला. त्यांना २३ जंबो टँकर सोबत दोन ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाऊ पर्यंत पहाट झाली. तासगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी सगळेच या गोष्टीला पाहून अवाक झाले. मात्र परिस्थिती इतकी वाईट होत चालली आहे आपण नाही करणार तर कोण करणार अशी भावना ठेवून ते अविरत काम करत असतात. त्यांच्या कामाचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे.
रात्री अपरात्री कधीही अडचण आली तर नागरिकांच्या साठी रोहित पाटील यांचा मोबाईल २४×७ उपलब्ध आहे. लोकांच्या मध्ये त्यांच्या या कार्याच्या बद्दल जबरदस्त सकारात्मक वातावरण आहे!