अबब! चीनचा आता भारतीय लोकांच्या केसांवर डोळा केसांची होतेय तस्करी

0

ड्रग्ज, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू , घड्याळ, सोने, चांदी यांच्या तस्करीच्या रोमांचकारी घटना तुम्ही ऐकल्या असतील. परंतु, आता तुम्ही अत्यंत चमत्कारिक वस्तुच्या तस्करीची बातमी वाचणार आहात. डोक्यावरचे केस ज्यांना क्षुल्लक वाटतात, त्यांच्यासाठी ही बातमी थक्क करणारी ठरेल. बरेचजणांना केसांच्या विविध हेअरस्टाइल करायला आवडतात.फुगे पाडणे, एखाद्या नटासारखी, खेळाडूसारखी हेअर स्टाइल करण सर्रास केल जात.दर महिन्याला केस कापले जातात.पण या कापलेल्या केसांच नाभिक करतात तरी काय?तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या केसांना साठवून विकल जात.आणि त्यातून चांगले पैसे मिळवले जातात.

पुढे या केसातून विग, गंगावन,पॅच विग बनवले जातात.घर की खेती असणारे, सतत वाढणारे आपले केस बाजारात चांगलेच मूल्यवान आहेत.महिलांनाही लांब केसाची आवड असते परंतु स्टाईलसाठी हे केस कापले जातात,लेडीज पार्लरमध्ये जमा झालेले हे केससुद्धा विकले जातात.यापासून बनवलेले गंगावन परत लांब केसांची आवड असणाऱ्या महिला खरेदी करतात.आतातर केसांची तस्करी समोर आली आहे.संपूर्ण जगाला कोरोना देत वेठीस धरणाऱ्या चीनचे काळे कारनामे सातत्यान सुरू असतात.भारतीय भूमी बळकवण्याचा त्यांचा डाव सातत्याने आपले सैनिक हाणून पाडत असतात.चीनी स्वस्त वस्तूंचा सुळसुळाट सगळीकडे चालू आहे.याच चीनने केसांची तस्करीसुध्दा चालू केली आहे.एरवी साप,कासव,पक्ष्यांची घरटी यांची तस्करी करणार चीन या केसांच करत तरी काय? कशी होते ही तस्करी वाचा सविस्तर.

मानवी केसांनी भरलेले दोन ट्रक आसाम रायफल्सने पकडले असून यात 120 बॅगमध्ये भरलेले 50 किलो केस पकडण्यात आले आणि केसांची किंमत तब्बल 2 कोटी रुपये आहे.आसाम रायफल्सच्या सेरचिप बटालियनने चंपाई जिल्ह्यातील कस्टम विभागाची मदत घेत ही कारवाई केली आहे.हे केस मिझोरम येथून म्यानमारला पाठवण्यात येत होते.एवढे दोन ट्रक केस आले कुठून? हा प्रश्न पडण सहाजिकच आहे.तर हे केस आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातून गोळा करण्यात आले होते.

तिरुपती देवस्थानाला भेट दिल्यानंतर अनेक भाविक डोक्यावरील संपूर्ण केसांच वपन करून घेतात किंबहुन केस कापून घेण्यासाठी महिला,पुरुष,लहान मुल यांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या दिसून येतात.तिरुपतीहून गोळा केलेले हे केस मिझोरमला आणण्यात येऊन तिथून म्यानमारला पाठविण्यात येणार होते.म्यानमारमध्ये केस विलगीकरण व इतर प्रक्रिया करण्यात येऊन ते चीनमध्ये विग बनवण्यासाठी पाठवण्यात येणार होते.तस्करीच हे रॅकेट आसाम रायफल्सने हाणून पाडल आहे.

भारत आणि म्यानमार या देशांची सीमा खुली असून येथे कोणतीही तटबंदी नाही.परिणामी दोन्ही देशातील नागरिक सहज परस्पर प्रवेश करू शकतात.सीमेवर चेकपोस्ट असले तरी त्यांना चुकवून तस्करी केली जाते.चीनमध्ये अनेक परंपरागत समजुती असून त्यानुसार साप, कासव पक्षांची घरटी खाल्ली जातात.परिणामी ड्रग्ज,सोने,प्राणी यांची तस्करी सर्रास पकडली जाते परंतु यावेळी चक्क केसांची तस्करी पकडली गेली आहे.

यातून अशीही माहिती समोर आली आली आहे की, फक्त तिरुपती देवस्थान नव्हे तर देशातील अनेक धार्मिक स्थळ जिथे भक्त श्रद्धेने केस कापतात तेथून हे केस जमवले जातात.विविध ठिकाणांहून जमा केलेले हे केस एकत्र करून मिझोरमला आणण्यात येतात तेथून ते म्यानमारला जातात जेथे पांढरे केस वेगळे केले जातात व प्रक्रिया करून चीनला पाठवले जातात.चीनमध्ये या केसांचे विग,गंगावन,पॅच बनवले जातात.टक्कल असणाऱ्या लोकांत या विग व पॅचची मागणी असून त्यांच मार्केट मोठ्या प्रमाणावर आहे.चीनमध्ये बनवलेले हे केसांचे वीग, गंगावन,पॅच संपूर्ण जगात तसेच भारतातही विकले जातात.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.