
राज्यात कोरोनाचा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना पुणे येथेही पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात कोरोना बाधितांची सझख्य1 वाढत आहे.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली यामध्ये चर्चेनंतर अजित पवार यांनी पुण्यात 1एप्रिलपर्यंत लॉकडाऊन नाही अस स्पष्ट केल.परंतु जर नागरिकांनी नियम पाळले नाहीत व रुग्णसंख्या वाढली तर मात्र 2 एप्रिलपासून लॉकडाऊनला पर्याय नसेल अस त्यांनी स्पष्ट केल.
अजित पवार साहेबांच्या या बैठकीत पुण्यातील कोरोनाची सद्य परिस्थिती, रुग्णसंख्या,सोयी,लसीकरण यावर चर्चा झाली, त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती दिली.त्यापैकी काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे
1.सामूहिक होळी,रंगपंचमी साजरी करू नये
2.विवाह समारंभास 50 पेक्षा अधिक जण उपस्थित नसावेत
3.अंत्यविधीला 20पेक्षा अधिक लोकांची गर्दी असू नये.
4.पिंपरीचे जम्बो कोविड सेंटर सुरू करणार
5.ससून रुग्णलयात 500 बेडची सोय करणार
6.जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार
7.संध्याकाळी सर्व बागा बंद राहणार
8.1 एप्रिलपासून पुण्यातील सर्व खाजगी कार्यक्रम पुढे ढकलण्याच आवाहन
दरम्यान पुण्यात वाढणारी कोविड संख्या पाहता प्रशासनाने 1एप्रिल ते 14 एप्रिल लॉकडाऊन लागू करावा असा आग्रह धरत होते परंतु अजितदादा पवार आणि आयएएस अधिकारी यांनी लाॅकडाऊनला विरोध करत 1 एप्रिलला आणखी एक बैठक घेण्याचे ठरवले आहे.परिणामी पुण्यात तूर्तास लॉकडाऊन लागणार नाही.