‘अंबानींच्या हेलिपॅडसाठी भाजपाने रचले आहे स्फोटक भरलेल्या जीपचे षडयंत्र!’ नाना पाटोलेंचा खळबळजनक आरोप

0

मुकेश अंबानी यांच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळत नाही म्हणून भाजपाने स्फोटकांचा गाडीचे प्रकरण घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानी यांची प्रतिमा मलिन झाली असल्याने शेयर बाजारात त्यांच्या कंपनीला नुकसान सोसावे लागत आहे, हे टाळण्यासाठी भाजपाने हा पातळयंत्री कट रचल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मनसुख हिरेन प्रकरणावर बोलताना पटोले यांनी २००९ साली झालेल्या अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेचा उल्लेख केला. या प्रकरणात देखील ज्याचे नाव समोर आले त्याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला होता, अशी आठवण नाना पटोले यांनी सांगितली. इतकेच नाही, भाजपाने महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा न करता, नको त्या मुद्द्यांवर अधिवेशनात वेळकाढुपणा केल्याचा देखील आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

भाजपासाठी अदानी आणि अंबानी हे म्हणजेच देश असून त्यांचा व्यवसाय गडगडायला लागला की त्यांना सहारा देण्यासाठी असले षडयंत्र रचत असते, असा खणखणीत टोला देखील नाना पटोले यांनी यावेळी लागवला आहे. फडणवीस सरकारच्या काळात होती तीच पोलीस यंत्रणा आज असून त्यांच्यावर अविश्वास दाखविणे चुकीचे असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.